नवलराज काळे यांची वैभववाडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या उपसरपंच पदी निवड
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी श्री नवलराज सुरेखा विजयसिंह काळे यांची वैभववाडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या उपसरपंच पदी निवड झाले बद्दल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभ हस्ते वैभववाडी भाजप कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, तालुका सरचिटणीस संजय सावंत, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, सीमा नानिवडेकर, माजी उपसभापती अंबाजी हुंबे, तालुका चिटणीस रितेश सुतार, ओबीसी तालुका अध्यक्ष भाजपा उत्तम सुतार, नगराध्याक्षा श्रद्धा रावराणे, माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर, नगरसेविका संगीता चव्हाण, माझे पंचायत समिती सदस्या अनुज्ञा अंकुश अंगवलकर, अतुल सरवटे,सूरज तावडे,अंकुश आंगवलकर, आनंद फोंडके, पांडुरंग गुरखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.