नाधवडे बौद्धवाडी येथील नळ योजनेची मोटार जळल्यामुळे गेले आठ दिवस करत आहेत येथील ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना

0 minutes, 0 seconds Read

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

नाधवडे बौद्धवाडी येथील नळ योजनेची मोटार जळल्यामुळे गेले आठ दिवस करत आहेत येथील ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना
     

नाधवडे बौद्धवाडी येथील नळ योजनेची मोटार जळल्यामुळे गेले आठ दिवस येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

        नाधवडे बौध्दवाडीला पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र नळयोजना आहे. सोमवारी १९ तारीखला नळयोजनेची मोटारमध्ये बिघाड झाल्यामुळे नळयोजना बंद पडली आहे. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरीत मुबलपाणी साठा असूनही नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.
मे महिना असल्यामुळे वाडीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी आलेले आहेत. त्यातच कार्यक्रमांचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. तरी नळयोजनेची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *