जामसंडे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ ठरला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी
जामसंडे येथील इंदिराबाई ठाकुर क्रीडानगरी येथे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी मंडळाच्यावतीने व पालकमंत्री नीतेश राणे व हौशी कबड्डी संघटना – सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने पुरुष गटातील भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजप चिटणीस संतोष किंजवडेकर, न. पं. चे सार्वजनिक बांधकाम सभापती शरद ठुकरुल, युवामोर्चा देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, मिलिंद साटम, मंगेश लोके, नरेश डामरी, प्रवीण जोग, बाबू लाड, प्रशांत वारीक, सौ. मृणालिनी भडसाळे, वाहतूक पोलीस प्रवीण सावंत, चद्रकांत कावले,जामसंडे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, विद्याधर जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत देवगड तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राहुल मानवर, तनिष्का वारीक, तनिष्का तर्फे, सानिका पावशे, कबड्डी गीतकार प्रणव घाडी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्तविक प्रशांत वारीक यांनी केले. या स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, यंगस्टार कणकवली संघाने द्वितीय व मांक, पंचक्रोशी फोंडा संघाने तृतीय क्रमांक, लक्ष्मीनारायण – वालावल संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ जय महाराष्ट्र – सावंतवाडी संघ, अष्टपैलू खेळाडू अजिंक्य महाले (पंचक्रोशी जामसंडे), अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच म्हणून प्रथमेश पेडणेकर (यंगस्टार कणकवली), अंतिम सामन्यातील गेम चेंजर खेळाडू मकरंद पाटकर (पंचक्रोशी जामसंडे), उत्कृष्ट चढाई-सुमित गावडे (यंगस्टार कणकवली), उत्कृष्ट पकड सिद्धेश्वर भडसाळे (जामसंडे) यांना सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोग, अंकुश उर्फ बाबू लाड, दयानंद पाटील, सौ. हर्षा ठाकुर, मृणालिनी भडसाळे, प्रशांत वारीक, संदेश पाटकर, विनायक सांगळे, अभिषेक सांगळे, पराग हिरनाईक, रुपेश साठे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन ऋत्विक धुरी, प्रणव घाडी, मोहन सनगाळे यांनी केले. आभार विनायक सांगळे यांनी मानले.