देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन उद्या ८ मार्चला

0 minutes, 1 second Read

 

 

देवगड / प्रतिनिधी

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन उद्या ८ मार्चला

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. जामसंडे खाकशी सडा येथील आंबा पॅकिंग- ग्रेडींग सेंटर येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य तथा आमदार किरण सामंत, सदस्य तथा माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित राहणार आहेत. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने आंब्यामधील साका ओळखण्यासाठी आंबा साका स्कॅनिंग मशिनची सोय उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. अजित गोगटे, उपाध्यक्ष डॉ. डी. बी. बलवान, व्यवस्थापक संतोष पाटकर यांनी केले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *