सावंतवाडी (प्रतिनिधी)
बांदा येथे जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वक्तृत्व स्पर्धेत दुसरी ते चौथी गट- प्रथम- सार्थक राणे (जिल्हा परिषद इन्सुली नं. १०), द्वितीय- सर्वज्ञ वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १), तृतीय- दक्ष वालावलकर (सुधाताई कामत शाळा नं. २ सावंतवाडी).
पाचवी ते सातवी गट, प्रथम- मैथिली सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), द्वितीय- प्रणिता सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), तृतीय- श्रुतिका राजगोळकर (जिल्हा परिषद इन्सुली नं. ५). आठवी ते दहावी गट, प्रथम- मिताली कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), द्वितीय- शमिका आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ).पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धा- इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी गट- प्रथम- सार्थक वालावलकर, द्वितीय- वेदांत वीर, तृतीय- ईश्वरी गवस. इयत्ता चौथी ते इयत्ता सहावी गट- प्रथम- सर्वज्ञ वराडकर, द्वितीय- आर्या ठाकर, तृतीय- दुर्वा नाटेकर. इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी गट – प्रथम- वासंती धुरी, द्वितीय : नैतिक मोरजकर, तृतीय- सीमा गवस. विजेत्यांना १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती सोहळ्यात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
