गवारेडे थेट पोचले आरे हायस्कूल परिसरात ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

गवारेडे थेट पोचले आरे हायस्कूल परिसरात ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट

देवगड तालुक्यात गवारेड्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून गवारेड्याच्या कळपाने अनेकदा चारचाकी, व दुचाकी वाहनावर हल्ले केल्याच्या घटना ताज्या असताना सोमवारी ११ वाजता गवारेड्याच्या कळपाने आरे हायस्कूल परिसरात आपला मोर्चा वळविला.अचानक हायस्कूल परिसरात दाखल झालेल्या गवारेड्यांच्या कळपामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान आरे गावचे माजी सरपंच महेश पाटोळे यांनी तात्काळ वन विभागाला फोन करून वनरक्षक राठोड यांना बोलावून घेतले.व तात्काळ या गवारेड्याचा बंदोबस्त आपल्या विभागामार्फत करण्यात यावा. सदर गवारेड्यांचा वावर देवगड तालुक्यात खूप वाढला आहे.यापूर्वी गवारेड्यांनी दिवसाढवळ्या दुचाकी चारचाकी वाहनांवर दिवसाढवळ्या हल्ले देखील केले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान देखील झाले आहे .तरी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी असे यावेळी आरे माजी सरपंच महेश पाटोळे, व आरे ग्रामस्थांनी वनरक्षक राठोड यांना सांगण्यात आले .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *