देवगड तालुका दैवज्ञ समाजाचा २८ जुलै रोजी स्नेहमेळावा, पाककला स्पर्धेचे केले आयोजन

0 minutes, 1 second Read

देवगड तालुका दैवज्ञ समाजाचा २८ जुलै रोजी स्नेहमेळावा, पाककला स्पर्धेचे केले आयोजन

 

देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४

 

दैवज्ञ हितवर्धक समाज देवगड व दैवज्ञ महिला मंडळ देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय सातपायरी डायमंड हॉटेलच्या मागे, सोनार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महिलांसाठी पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहमेळावा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केला आहे.
सन २०२३ २०२४ या वर्षातील ५ वी ८ वी स्कॉलरशिप, १० वी १२ वी, पदवी उत्तीर्ण व विशेष प्राविण्य मिळविलेल्या ज्ञातीतील समाज बांधव, तसेच विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह व
सर्टिफिकेट सह ता. २६ जुलै पर्यंत निलरत्न मालंडकर -९४२३८३३११८ या WhatsApp क्रमांकावर पाठवून द्याव्यात. तसेच संदिप तळवडेकर ९७६४७९२६४६ तळेबाजार, महेश घारे – ९४२१२६४०७४ देवगड यांच्याशी संपर्क साधावा .तसेच
पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी नाचणी या घटकापासून गोड व तिखट पदार्थ बनविणे या विषय आहे.या पाककला
स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या २० स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घेता येईल. अधिक माहतीसाठी दर्शना कुळकर्णी ९४२०३०५३०६ व प्राजक्ता घारे ९८५०८८४८५३ यांच्याशी संपर्क साधावा. असे
आवाहन दैवज्ञ महिला मंडळा अध्यक्षा सौ. दर्शना दिनेश कुळकर्णी व दैवज्ञ हितवर्धक समाज अध्यक्ष
वसंत श्रीधर तळवडेकर यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *