ऍड.कौस्तुभ मराठे यांची नोटरी पदी नियुक्ती

 

देवगड (प्रतिनीधी)

ऍड.कौस्तुभ मराठे यांची नोटरी पदी नियुक्ती

देवगड येथील ऍड. कौस्तुभ मराठे यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे . ऍड.मराठे हे देवगड येथील प्रसिद्ध दिवाणी व फौजदारी विधीज्ञ असून ते आता केंद्र सरकारद्वारा संपूर्ण देवगड विभागासाठी नोटरी म्हणून नियुक्त झाले आहेत . मागील १५ वर्षात त्यांनी अनेक क्लिष्ट दिवाणी व फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत . ऍड.कौस्तुभ मराठे यांचे संपूर्ण घराणे वकिली व्यवसायाशी संबंधित असून ते चौथ्या पिढीतील वकील आहेत . मुंबई उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग व देवगड कणकवली मालवण कोल्हापूर येथील न्यायालयांमध्ये ऍड मराठे यांनी खटले चालवले आहेत . ऍड.मराठे यांची नोटरी पदावर नियुक्ती झाल्याने आता करार , शपथपत्रे . कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्त साक्षांकित करण्यासाठी देवगड मधील जनतेला सुविधा उपलब्ध झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *