खर्डेकर महाविद्यालयात “सायबर गुन्हे व आपली सामाजिक जबाबदारी” चर्चासत्र संपन्न

0 minutes, 2 seconds Read

 

वेगुर्ले (नितीन गावडे)

 

 

खर्डेकर महाविद्यालयात “सायबर गुन्हे व आपली सामाजिक जबाबदारी” चर्चासत्र संपन्न

 

बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला ,पोलीस ठाणे वेंगुर्ला, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर गुन्हे आणि आपली सामाजिक जबाबदारी” याविषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी काळजीपूर्वक कसा करावा, तसेच सायबर गुन्ह्यापासून कसे दूर राहावे या विषयी मार्गदर्शन केले.

 

वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चव्हाण यांनी सायबर गुन्ह्यात अडकत जाणारे युवक व युवती, त्यांनी घ्यावयाच्या दक्षता तसेच तसेच सोशल मीडियाचा वापर कसा टाळला पाहिजे यावर मार्गदर्शन केले.

 

त्याचप्रमाणे महिला पोलिस नाईक सावी पाटील यांनी सोशल मिडियाचा विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला अतिरिक्त वापर व त्यातून होणारे लैंगिक आकर्षण,निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, त्यातून निर्माण झालेले गुन्हे या चक्रव्यूहात अडकत चाललेला युवक त्यांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.

तसेच पोलिस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर यांनी व्यसनाधीनतेत अडकत चाललेला युवक, नशामुक्तीसाठी त्यांनी करावयाची उपाययोजना, रस्ता सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. वाय. नाईक यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विवेक चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. सुनील भिसे यांनी केले. यावेळी प्रा. वामन गावडे, डॉ. वसंतराव पाटोळे, डॉ. कमलेश कांबळे, डॉ. जी. पी. धुरी, डॉ.सचिन परुळकर,प्रा. बोरवडेकर तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *