देवगड (प्रतिनिधी)
सत्ता असूनही देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यास त्याना अपयश – बुवा तारी
नितेश राणे यांनी आमदारकीची दहा वर्ष उपभोगली परंतु मागील पाच वर्षात देवगड जामसंडे मधील गंभीर पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश असून शिवसेनेच्या माध्यमातून नियोजित देवगड जामसंडे नगरपंचायती करता आवश्यक असलेला पाणी आरक्षण दाखला विद्यमान नगराध्यक्ष, खास. विनायक राऊत,नाम. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मिळविण्यात आला यापुढील काळात पुढील एक वर्षात देवगड जामसंडेच्या नियोजित नळ पाणी योजनेचा प्रश्न निश्चितपणे सोडविण्यात येईल असा विश्वास उबाठा शिवसेना उपतालुकाप्रमुख नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यावेळी यावेळी नगरसेवक तेजस मामघाडी, विभागप्रमुख विकास कोयंडे उपस्थित होते.
यापुढे बोलताना बुवा तारी म्हणाले ,ऐन त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवाच्या काळात प्रशासनाने देवगड जामसंडे येथील कचरा संकलन न करण्याची नामुष्की आली याला जबाबदार भाजपचे माजी नगराध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी दिलेली जागा ही बंद केली असून नगराध्यक्ष चा कालावधी पाच वर्षाच्या झाल्यामुळे भाजप पदाधिकारी व नगरसेवक यांचा हिमोड झाला ज्यावेळी माजी नगराध्यक्षांनी कचरा डेपो जागा उपलब्ध करून दिली त्यावेळी त्यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला तशाच त्या नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करून बंदी आणली असून यापुढील मासिक सभेत त्या माजी नगराध्यक्षांचा निषेधाचाही ठराव भाजप नगरसेवकांनी घ्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी बोलताना केली .
देवगडचा कचरा प्रश्न आणि पाणी प्रश्न देखील विद्यमान आमदार मागील पाच वर्षात सोडू शकले नाहीत. फक्त वॉटर पार्क वॅक्स म्युझिअम व अन्य असे इव्हेंट केले पण देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यास त्याना अपयश आले आहे .महाविकास आघाडीच्या काळात देवगड येथील ग्रामीणरुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला व खऱ्या अर्थाने चालना मिळाली पण त्यानंतरच्या काळात आज देवगडच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तो सोडविण्यात देखील स्थानिक आमदार सत्ताधारी याना अपयश आले आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री असताना या रुग्णालयाकरिता निधी आणण्यात आला होता. तसेच नगरोत्थान मधून निधी आलेला असताना देवगड पवनचक्की येथील गार्डन करता आवश्यक असणे पार्किंग, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा या निधीचा देखील योग्य पद्धतीने विनियोय करण्यात आलेला नाही असा आरोपी त्यांनी केला.तसेच देवगड जामसंडे शहरात आवश्यक असे एखादे सुलभ प्रसाधनगृह देखील उभारणी न करता , देवगड बस स्थानकाच्या दुरुस्तीबाबत स्ट्रक्चर ऑडिट झालेले नसून या बांधकामांच्या शिगा ह्या पूर्णपणे सडलेल्या आहेत त्यास वर प्लॅस्टर करण्याचे काम सुरू आहे.ते काम निकृष्ठ असून जनतेला आवश्यक असणारे प्रसाधन गृह अर्धवट स्थितीत असून याकडे देखील स्थानिक आमदारांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
शिवसेनेने नळपाणी योजनेचे ऑडिट केले ,स्थानिक आमंदार यांनी. सभागृहात शब्द देऊन देवगडचा पाणी समस्या मार्गी लाऊ असे सांगण्यात आले परंतु अद्याप पाणी प्रश्न रखडलेला आहे हे आमदारांचे अपयश आहे किंवा देवगड वासियांवर राग काढायचा विकास कामांमध्ये सुडाचे राजकारणच करण्यात येत आहे गेली दहा वर्ष पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू असताना पाणीपुरवठा विभाग म्हणजे यांच्याकडे शिवसेनेचाच माध्यमातून पाठपुरावा केला गेला त्यानंतर आवश्यक असणारी फायर बिग्रेड ची गाडी बीच क्लीन मशीन व अन्य सोयी सुविधा देखील देवगड नगरपंचायत मध्ये उपलब्ध करून देण्याकरता शिवसेना नगरसेवक ,नगराध्यक्ष, यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले असे सांगून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पात खाडीपात्रात जो गाळ भरला आहे त्यामुळे मच्छीमारे बांधवांना होणारा त्रास या संदर्भात आपण उपोषण करण्याचा इशारा संबंधित मत्स्य व्यवसाय विभागात दिला होता त्या अनुषंगाने त्या त्यांनी दिलेल्या योग्य त्या कार्यवाही करून हा खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी या प्रकल्प स्थळी ड्रेजर दाखल झाला असून या गाळाचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहे .कचरा संकलन करिता आवश्यक असणाऱ्या जागेसाठी यापूर्वी अन्य जागाही बघण्याचा पाहण्यात आल्या होत्या अनुषंगाने दाभोळे येथील जागेचा प्रश्न सुटला होता व त्या ठिकाणी आवश्यक चे तयारी करण्यात आली होती परंतु राजकारण करून ही जागा देखील किंवा बंद करण्यात आली.
