देवगड (प्रतिनिधी)
देवगड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
शहरातील एका बिल्डिंग बांधकामात मोल मजुरीचे काम करणारा कामगार सुरेश भुईया राहणार (३९ रा. गोविंदपूर झारखंड) यांचे शुक्रवारी सकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालय येथे निधन झाले. या घटनेची देवगड पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे.
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरेश भुईया यांच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अत्यवस्थ स्थितीत देवगड ग्रामीण रुग्णात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती अर्जुन रामाशंकर भुईया (४७ रा. रामगड झारखंड) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करत आहे.
