श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी एकनाथ तेली तर सचिव पदी हेमंत वातकर यांची निवड
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्षपदी एकनाथ केशव तेली, यांची तर सचिव पदी हेमंत वसंत वातकर यांची निवड सर्वांनुमध्ये करण्यात आली. या नेसायच्या सन २०२४-२५ ते २०२६-२७ या वर्षाकरिता विश्वस्त मंडळाचे नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली आहे.
नूतन विश्वस्तांनी न्यासाचा पदभार गुरुवारी १४ नोव्हेंबर पासून स्वीकारला आहे.या नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी एकनाथ केशव तेली,उपाध्यक्षपदी गणेश गोपाळ वाळके, सचिवपदी हेमंत वसंत वातकर, खजिनदारपदी उदय चंद्रकांत पेडणेकर, सदस्यपदी संतोष गोपीनाथ लाड, संजय वासुदेव वाळके, शैलेश बाळकृष्ण बोंडाळे, महेश गणपत जोईल, विलास चंद्रकांत वाळके, महेश रमाकांत पेडणेकर, अनिल कृष्णा धुरी, दीपक केशव घाडी, प्रमोद महादेव साटम, श्रीकृष्ण अनंत बोंडाळे, विलास दत्तात्रय कुलकर्णी, महेश विठ्ठल ताम्हणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मावळते अध्यक्ष संतोष लब्दे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.