जनसेवेची संधी द्या, विकास घडवून दाखवेन -बंदेनवाज खाणी 

 

देवगड (प्रतिनिधी)

जनसेवेची संधी द्या, विकास घडवून दाखवेन -बंदेनवाज खाणी 

कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देवगड तालुक्यातील नाडण येथे त्यांनी नुकतीच मतदारांची भेट घेतली. आपण सर्व सामाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सदेव तत्पर आहोत, जनतेचे प्रश्न हे मी आपले प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या
विधानसभा मतदारसंघात जनसेवेची आपल्याला एक संधी द्या. या मतदारसंघाच्या शाश्वत विकास आपण घडवून आणू, असेही त्यांनी सांगितले.

 

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यात नाडण गावातील प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले, सरकारी व सार्वजनिक संस्थांमधील रिक्त पदांवर सर्व समाजातील होतकरू व शैक्षणिक पात्रता धारकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाच्या उन्नतीसाठी कार्यतत्पर कार्यकर्ता म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे निर्भयपणे मतदान करून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत आमदार म्हणून पाठवा, परिवर्तनातून साध्य झालेला विकास काय असतो, हे मी माझ्या विजयानंतर जनतेला दाखवून देईल, असेही त्यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *