कणकवली दि १३ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
राणेंनी उद्योग खात्यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ,त्यामुळेच राणेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नाही – विनायक राऊत
नारायण राणे यांच्याकडे मोदींनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. या मंत्रिपदाच्या काळात राणे एकही उद्योग सिंधुदुर्गात आणू शकलेले नाहीत. उलट मंत्रीपदाचा गैरवापर करून त्यांनी या खात्याच्या माध्यमातून तब्बल ३ हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केला.
