कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे नागरिक, व्यापारी यांनी केले अभिनंदन 

 

कणकवली दि २० सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर) 

 

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे नागरिक, व्यापारी यांनी केले अभिनंदन 

 

कणकवली न.पं.चा कारभार स्वीकारल्यानंतर फारच कमी वेळात गणेश चतुर्थीच्या एकंदरीतच नियोजनात मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यानी दिलेले योगदान व त्यामुळे गणेश भक्त, चाकरमानी, नागरिक, व्यापारी इत्यादी साऱ्याच वर्गवारीतील जनतेने यंदाचा गणेश चतुर्थी उत्सव फारच चांगल्या व आनंदात अनुभवला. व्यापारी संघाने गणेश चतुर्थी पूर्वीच्या नियोजन सभेत केलेल्या सूचना/विनंती यांचा आदर केला गेला, व गणेश भक्ताना आनंददायक गणेश चतुर्थी साजरी करता आली.

 

यानिमित्ताने कणकवली व्यापारी संघाने मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांची आज भेट घेऊन अभिनंदन केले,आणि व्यापारी संघाच्या सर्वच सामाजिक उपक्रमाना असेच सहकार्य करावे अशी विनंती केली. मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांचा प्रतिसाद सकारात्मक होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *