Oplus_16908288

जागतिक महिला दिनानिमित्त कणकवलीत भव्य रक्तदान शिबीर ; आयोजकांकडून नागरिकांना रक्तदानाचे आवाहन…!

0 minutes, 0 seconds Read

कणकवली (प्रतिनिधी)

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कणकवली शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायत, कणकवली नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 12 मार्च 2026 रोजी हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे.

हे शिबिर कणकवली नगरपंचायतच्या बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *