कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती जिंकणार उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांचा निर्धार

कणकवली (प्रतिनिधी)

 

कळसुली जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावांमध्ये खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यातून सर्वांगिण विकास झालेला आहे. त्यामुळे महायुतीच्या कळसुली जि.प.च्या उमेदवार शितल दळवी, कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे व ओसरगांव पं.स.च्या उमेदवार अक्षता राणे यांचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होईल. या मतदारसंघात महायुती जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

वागदे येथील श्री उभादेव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफल वाढवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, सर्व उमेदवार, वागदे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगांवकर, रवी गावडे, समीर प्रभूगांवकर, निसार शेख, अभय माडीगांवकर, शशी राणे, शिंदे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दामू सावंत, श्री. काणेकर व इतर उपस्थित होते.

मतदारसंघातील रस्ते, स्वतंत्र फिडरचा प्रश्न पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे या मतदारसंघात आमच्या सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे वागदे सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले,

गेल्या पाच वर्षात आपण ओसरंगांव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीवर विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या भागाच्या सर्वागिण विकासासाठी आपण सर्वच कटिबद्ध असल्याचे तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री म्हणाले.

 

तर महायुतीच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगिण विकास साधण्यात येत असून मतदार आमच्या पाठीशी आहेत. याठिकाणी जि.प. व दोन्ही पं.स.च्या जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख दाम् सावंत यांनी व्यक्त केला.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *