कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा‌ सायली संजय मालंडकर यांचे निधन 

 

कणकवली दि १४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) 

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा‌ सायली संजय मालंडकर यांचे निधन 

कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा कांबळेगल्ली गणपती साना येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (५२) यांचे गुरुवारी सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. गेली काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार करून पुढील उपचारासाठी बांबुळी येथे हलवण्यात आले होते.

कणकवली शहरातील सामाजिक व राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग होता. कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. यासोबतच कणकवली शहरातील मंडळातील महिलांच्या विविध ग्रुपमध्ये अक्टिव्ह असणाऱ्या त्या महिला होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते रिक्षा व्यवसायिक संजय मालंडकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *