Oplus_16908288

आंदुर्ले येथे आज पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळा !

आंदुर्ले येथे आज पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळा !

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेतील पखवाज वादनाची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, पखवाज अलंकार महेश सावंत आणि विद्यार्थी परीवार यांच्यावतीने भूषण देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, १ फेब्रुवारी रोजी पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या आंदुर्ले (ता. कुडाळ) येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नामवंत पखवाजाचार्य व संगीत साधक सहभागी होणार आहेत.

 

या कार्यशाळेसाठी मृदुंग महामेरू अशोक महाराज पांचाळ गुरुजी (देवाची आळंदी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शास्त्रीय पखवाज वादनातील तांत्रिक बाजू, तालशुद्धता, वादनाची बैठक, बोलांची रचना तसेच भजन व अभंग वादनातील पखवाजाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात सकाळी ७.३० वाजता होणार असून उद्घाटन सोहळ्यानंतर पखवाज वादन कार्यशाळेस प्रारंभ होईल.

 

सकाळी ८ वाजता शास्त्रीय मार्गदर्शन व प्रात्यक्षिके, भजनातील वादन शैली तसेच अभंगवारी पद्धतीने पखवाज वादन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध भजन सम्राट रविदासबुवा पवार (आळंदीकर) यांच्या सुमधुर आवाजात भजन गायन कार्यक्रम होणार आहे. त्यांना मृदंगाचार्य मंगेश महाराज कदम, आकाश पारखे, तुकाराम जानगुडे आणि सोपान बुवा कुरकुटे यांच पखवाज साथ लाभणार आहे. या कार्यशाळेला संगीत रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री जगन्नाथ संगीत विद्यालय तसेच विद्यार्थ्यांनी केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *