आचरा विभागात ठाकरेसेनला धक्का ; राजू हिर्लेकर, अनिकेत मांजरेकर शिवसेनेत

 

आचरा – अर्जुन बापर्डेकर

 

आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून मतदान काही दिवसांवर येवून ठेपले असताना ठाकरे सेनेचे कट्टर शिवसैनिक शिंदे सेनेची वाट धरताना दिसत आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा येथे कुडोपी येथील राजू हिर्लेकर आणि आचरा पारवाडी येथील अनिकेत मांजरेकर या कट्टर ठाकरे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याच्या सह उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुकाध्यक्ष विनायक बाईत,विभाग प्रमुख संतोष कोदे,जेरोन फर्नांडिस, मंगेश गावकर,जयप्रकाश परुळेकर, जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, पं स.उमेदवार गणेश तोंडवळकर,यांसह शिवसेनेचे मनोज हडकर,रुपेश पाटकर, संतोष मिराशी, भाऊ हडकर, मुझफ्फर मुजावर,मांगिरीष सांबारी,पंकज आचरेकर,विजय कदम,उदय घाडी,अजित घाडी, राजन मेस्त्री यांसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *