अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परमहंस भालचंद्र महाराज की जय
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
कणकवली येथील श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास रविवारपासून येथील आश्रमात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेच्या काकड आरतीने या सोहळ्याची सुरूवात झाली.
त्यानंतर बाबांच्या समाधी दर्शनाला भाविकांचा सुरु झालेला ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांनी या पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थिती दर्शवत समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
