विद्यार्थ्यांनी देशासाठी सुजाण नागरिक बना आणि व्यसनाधीनते पासून दूर राहा – के.आर.दळवी

0 minutes, 3 seconds Read

विद्यार्थ्यांनी देशासाठी सुजाण नागरिक बना आणि व्यसनाधीनते पासून दूर राहा – के.आर.दळवी

कळसुली प्रशालेमध्ये देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा संपन्न

कणकवली दि १७ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनते पासून दूर राहा आणि देशासाठी सुजाण नागरिक बना. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाज्वल भावना निर्माण करण्यासाठीच देशभक्तीपर समुह गीत स्पर्धेचे आयोजन केले आहे.असे प्रतिपादन स्कूल कमिटी चेअरमन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष के.आर.दळवी यांनी केले.यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ते कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली येथे
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत गीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर, श्री प्रकाश दळवी (शिक्षण संघ मुंबई सल्लागार) व्हॉइस चेअरमन स्कूल कमिटी- नामदेव घाडीगावकर, श्री रजनीकांत सावंत -स्कूल कमिटी सदस्य,, सौ. शुभदा देसाई स्कूल कमिटी सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शिवाजी गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष- श्री बाबाजी मुरकर, श्री दिलीप सावंत-माजी तंटामुक्ती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सदस्या श्वेता दळवी ,प्रभाकर दळवी- शिक्षक पालक संघ सदस्य, हेमंत कुमार परब आदी उपस्थित होते

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्या निमित्त देशभक्तीपर समूहगीत गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक- इयत्ता सातवी तर द्वितीय क्रमांक – इयत्ता सहावी तृतीय क्रमांक – इयत्ता पाचवी तर माध्यमिक उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक- इयत्ता अकरावी तर द्वितीय क्रमांक- इयत्ता नववी तृतीय क्रमांक- इयत्ता आठवी यांनी पटकावले चंद्रशेखर महादेव दळवी (कळसुली शिक्षण संघ उपकार्याध्यक्ष )प्रायोजित घेण्यात आलेल्या स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. मुलांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन प्रशालेमध्ये दरवर्षी करण्यात येते असे त्यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले

प्रमुख उपस्थितामधून श्री प्रकाश दळवी यांनी आपण विद्यार्थी दशेत सुद्धा देशासाठी अनेक गोष्टी करू शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. पी. पवार यांनी केले तर परीक्षण एस. के. सावळ,आर्लेकर एस. एल.आणि श्री.राणे सी.एम. यांनी पाहिले. या कार्यक्रमासाठी वाद्यवृंदा मध्ये हार्मोनियम प्रशालेचे विद्यार्थी रूद्र गुरव, ढोलकी वादक गणेश मेस्त्री तबला गौरव मेस्त्री, हर्ष राणे ,दर्शन सावंत इत्यादींची साथ लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए जी सावंत यांनी केले यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक वगरे व्ही.व्ही. ज्येष्ठ शिक्षक एस.के.सावळ समस्त शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ वर्गातून करण्यात आले.यावेळी विद्यार्थी ,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *