दादा कुडतरकर यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची हानी! कलमठ येथे शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केली भावना
सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व,वक्तृत्व हे गुण होते. या गुणांमुळे त्यांनी विविध संघटनांना उर्जिताव्यस्थेत आणल्या. सामाजिक क्षेत्रातील दादा यांचे कार्य महान आहे. दादा हे उत्तम संघटक व मॅनेजमेंट गुरु होते. त्यांचा निधनामुळे सामाजिक क्षेत्रात ही पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून येणार नाही. कुडतरकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेणे ही त्यांचा खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कुडतरकर यांना निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना उपस्थितांनी केली.
सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ, ग्राहक पंचायत, कणकवली तालुका प्रवासी संघ, रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने कलमठ येथील पेन्शनर्स भवन येथे शोकसभा आयोजित केली होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष व प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, पेन्शनर्स संघटनेचे सचिव व्ही. एम. चव्हाण, ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्ष रमेश जोगळे, रोटरी कल्बचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी मोहन सावंत, सेवानिवृत्त प्राध्यापक हरिभाऊ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांची संघटना नावारुपास येण्यास दादा कुडतरकर यांचे योगदान मोठे होते, असे भालचंद्र मराठे यांनी सांगितले. दादा कुडतरकर यांचे सामाजिक कार्य महान आहे, त्यांचे हे कार्य अवितरपणे पुढे नेणे, हे आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे. विविध संघटनांमध्ये त्यांनी काम करताना त्यांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. देवींचे रुप म्हणून महिलांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन होता. दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व गुण असलेले दादा कुडतरकर यांचे अनाचक आमच्यातून जाणे ही वेदनादायी आहे, अशा भावना रिमा भोसले यांनी व्यक्त केल्या. दादा कुडतरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. शासकीय सेवेत काही खाती बदनाम खाती म्हणून ओळखली जातात. त्यापैकी वनखाते एक आहे. या खात्यात दादा कुडतरकर यांनी चांगले काम केले. वन विषयक अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. वनखात्यात सेवा करताना बदनाम असलेल्या या खात्याची प्रतिमा उंचविण्याचे काम कुडतरकर यांनी केले. वनखात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेसाठी आपले आयुष्य वेचले, असे अशोक करंबेळकर यांनी सांगतानाच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा कुडतरकर हे कुशल संघटन होते. त्यामुळे त्यांनी विविध संघटनांचे नेतृत्व करून त्या संघटना नावारूपास आणल्या, असे मनोहर पालयेकर यांनी सांगितले.
मोहन सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादा कुडतरकर यांच्या सहवासातील अठवणी जागवल्या. डी. पी. तानवडे, प्रमोद लिमये, हरिभाऊ भिसे, श्रद्धा कदम, केशव जाधव, श्रीपाद पाताडे, विष्णू दळवी, अर्जुन राणे, केशव जाधव, साखराम सपकाळ यांनी मनोगत व्यक्त करताना दादा कुडतरकर यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता, ते पुढे नेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दीपक बेलवलकर यांनी रोटरी क्लबमध्ये काम करताना दादा कुडतरकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेला सुंगधा देवरूखकर, महादेव चव्हाण, सिद्धार्थ तांबे, उन्मेश राणे, राजाराम परब, राजन भोसले, गोविंद घोरपडे, प्रदीप ढेकणे, विष्णूप्रसाद दळवी, अनुप्रिया रेगे, नितीन बांदेकर, विनायक पाताडे, कुबेर भोजे, भरत गावडे, वैशाली घाडी, गौरी साळकर, सुभाष राणे, भास्कर वंजारे, प्रदीपकुमार जाधव, गोविंद सावंत, केशव पावसकर, प्रवीण कडुतरकर, कुशाल कोरगावकर, रश्मी माणगावकर, सी. आर. चव्हाण उपस्थित होते.