मळेवाड कोंडूरे देऊळवाडी येथे बिबट्याचा हल्ला, चार गंभीर जखमी,

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मळेवाड कोंडूरे देऊळवाडी येथे बिबट्याचा हल्ला, चार गंभीर जखमी,

मळेवाड- सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर मुळीक यांच्या घरा मागे कुत्रा व मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडून मुळीक गेले असता त्यांच्यासमोरच बिबट्या असल्याने ते भयभीत झाले. मात्र बिबट्याने लगेचच प्रभाकर मुळीक (60) यांच्यावर हल्ला चढवत डोक्यावर पंजा मारत त्यांना गंभीर जखमी केले.यावेळी मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पलायन केले. यावेळी बिबट्या गेला की नाही हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी त्याची शोध मोहीम घेतली.ही शोध मोहीम घेत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सूर्यकांत सावंत (६३) आनंद न्हावी (५४) पंढरी आजगावकर (५२) यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्यात प्रभाकर मुळीक यांच्या डोक्यावर पंजा मारल्याने डोक्याला जबर जखम झाली आहे. पंढरी आजगावकर यांच्या डोक्याला व दोन्ही हाताला आनंद न्हावी यांच्या एका हाताला आणि पायाला तर सूर्यकांत सावंत यांच्या हाताला व डोक्याला बिबट्याने हल्ला करत जखम केली आहे.या सर्वांना कोंडूरे ग्रामस्थानी उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवीले.

या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करत या चारही जखमींना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले.दिवसाढवळ्या भरवस्तीत देऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुळीक यांच्या घरा मागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्या पाण्यातून बागेबाहेर जाणं कठीण असल्याने सदरचा बिबट्या हा बागेतच असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला. या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाणे व सावंतवाडी वनविभाग यांना दिल्यानंतर त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदरच्या बिबट्याला वन विभागाला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.

पालकमंत्री यांनी तात्काळ डी एफ ओ यांना दिले आदेश
या घटनेची माहिती मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मोबाईलवरून पालकमंत्री नितेश राणे यांना संपर्क साधून दिली असता पालकमंत्री राणे यांनी या घटनेबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात डी एफ ओ यांना कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश दिले.

डॉक्टरांनी तात्काळ केले उपचार जखमी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर एकाच वेळी चार जखमी रुग्ण आल्याने आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांची तारांबळ उडाली.मात्र या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर व डॉ.मस्के यांनी आपल्या कर्मचार्याना सोबत घेत जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार करत रुग्णवाहिकेने गोवा बांबूळी येथे अधीक उपचारासाठी पाठविले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *