देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली आधुनिक मतदान प्रक्रिया

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली आधुनिक मतदान प्रक्रिया

देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी शाळेमध्ये प्रथमच आधुनिक ईव्हीएम मशीन ॲप द्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्याचबरोबर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया चालते त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, बोटाला शाई लावणे, उमेदवारांचे अनुमोदक या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाऊन ईव्हीएम ॲपद्वारे आपले मत दिले. सर्व मतदारांना चिठ्ठ्या देखील देण्यात आलेल्या होत्या.

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असणाऱ्या देवगड हायस्कूलच्या उपक्रमांमध्ये या नवीन उपक्रमाची भर पडली. या मतदान प्रक्रियेला हायस्कूलच्या स्थानीय समितीचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर, स्थानीय समिती उपाध्यक्षा सौ. अर्चना नेने, स्थानीय समिती सदस्य सौ.अनुश्री पारकर यांनी सदिच्छा भेट देऊन नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ॲड. अविनाश माणगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि भविष्यामध्ये हे आजचे विद्यार्थी मतदार जागृत मतदार तयार होतील असे कथन केले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर आणि निवडणूक विभाग समिती मधील श्री राजेंद्र कोयंडे, श्री सुरेश पवार, सो आफरीन पठाण, श्री. प्रसाद शेवडे आणि श्री उमेश कोयंडे याने विशेष मेहनत घेऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती दिली.

शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी उत्तम सहकार्य केल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे मुख्याध्यापक श्री प्रवीण खडपकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी भविष्यात देखील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे देखील त्यांनी कथन केले.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *