करूळ घाटात संरक्षण कट्याला धडकून ट्रकला अपघात…

0 minutes, 1 second Read

 

 

वैभववाडी प्रतिनिधी

करूळ घाटात संरक्षण कट्याला धडकून ट्रकला अपघात…

चालकाचा ताबा सुटल्याने करूळ घाटात ट्रक संरक्षक कठड्याला धडकून अपघात झाला. सुदैवाने ट्रक कठड्याला धडकून तिथेच थांबला. अन्यथा दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. चालक सुनील गेनू जाधव वय ३८ रा. आनंद नगर कासार्डे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन कोल्हापूर ते कासार्डे असा प्रवास करीत होता.

ट्रक करूळ घाटात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक घाटातील संरक्षक कठढ्याला धडकला. सुदैवाने ट्रक तिथेच थांबल्यामुळे मोठा अपघात टाळला. अन्यथा ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला असता. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह धाव घेत. अपघाताची माहिती घेतली. तसेच वाहतूकीला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.याची खबरदारी घेतली त्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत सुरु होती.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *