कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांचा NCC कंबाइंड कॅम्पमध्ये सहभाग 

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांचा NCC कंबाइंड कॅम्पमध्ये सहभाग 

 ओरस येथे NCC च्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे        आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी द्वारे दिनांक 16 जून 2025 ते 25 जून 2025 या कालावधीत निवासी स्वरूपात आयोजित करण्यात आले. या दहा दिवशीय कॅम्प मध्ये कनेडी प्रशालेतील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले.

एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स ही भारतीय सशस्त्र दलाची युवा शाखा आहे. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनाने प्रेरित करणे आहे. एनसीसी कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांनी लष्करी प्रशिक्षण, कवायती, फायरिंग, ड्रील, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेतले.

या प्रशिक्षणार्थी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा. शिक्षक सागर गुरव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या या यशानिमित्त संस्था अध्यक्ष सतीशजी सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत आणि सर्व संचालक, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत आणि सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *