ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना मातृशोक ; ओसरगाव येथील श्रीमती अलका राणे यांचे निधन
कणकवली दि.११ऑगस्ट (प्रतिनिधी)
ओसरगाव येथील श्रीमती अलका आत्माराम राणे (वय ७२) यांचे रविवारी ११ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.श्रीमती अलका राणे या मनमिळाऊ स्वभावामुळे परीचित होत्या.युवक कल्याण पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप राणे व ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.