
देवगड (प्रतिनिधी)
देवगड-जामसंडे येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे विविध उपक्रमांतून उत्साही साजरा
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहराच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता जामसंडे येथील रामेश्वर मंदिर तसेच देवगड येथील ब्राह्मण देव मंदिरात साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दिर्बादेवी रामेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सकाळी ९.३० वाजता भाजपा कार्यालय, जामसंडे येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानंतर सकाळी १० वाजता देवगड-जामसंडे नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना हॅन्ड ग्लोज आणि मास्कचे वाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता देवगड ग्रामीण रुग्णालयाला कपाट भेट देण्यात आले. सकाळी ११.३० वाजता भाजपा कार्यालय, जामसंडे येथे मच्छीमार बांधवांसाठी आणि पत्रकार बंधूंसाठी अपघात विमा पॉलिसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सर्व उपक्रमांमुळे वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी आमदार अजितराव गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, माजी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, महिला मोर्चा अध्यक्षा उष:कला केळुस्कर, नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका आद्या गुमास्ते, तन्वी चांदोस्कर, संतोष तारी, निवृत्ती तारी, रोहन खेडेकर, व्ही.व्ही.सी. खडपकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहर युवा अध्यक्ष दया पाटील, महिला शहर अध्यक्षा तन्वी शिंदे, शहर उपाध्यक्षा मृणाली भडसाळे, सोशल मीडिया प्रमुख वैभव करंगुटकर, शक्तिकेंद्र प्रमुख राजा वालकर, गणपत गावकर, उल्हास मंचेकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, चंद्रकांत कावले, प्राजक्ता घाडी, अक्षता घाडी, संजय तारकर, ज्ञानेश्वर खवळे, बूथ अध्यक्ष योगेश घाडी, संतोष घाडी, अनुप बापट, सिद्धेश माणगावकर, अनिल कोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

