मातीच्या गोळ्याला आकार देणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला – विजयकुमार वळंजू

0 minutes, 0 seconds Read

कणकवली (प्रतिनिधी)

मातीच्या गोळ्याला आकार देणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला – विजयकुमार वळंजू

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सन २०२५ – २६ वर्षाचा प्रारंभ प्रवेश उत्सव मोठ्या थाटात पार पडला .यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विजयकुमार वळंजू विश्वस्थ श्री अनिलपंत डेगवेकर प्रशालेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून नगर पंचायतीचे प्रतिनिधि उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे यांनी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्यहार अर्पण करून विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना संस्थेचे सचिव श्री वळंजू यांनी आपल्या भाषणात म्हणाले ,लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार देण्यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला उत्कृष्ट कार्य करत आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकीत प्रशाला म्हणून गणली गेली आहे. सर्व प्रकारचे शिक्षण उत्तम प्रकारे देणारी प्रशाला आहे विद्यार्थांचे भविष्य निश्चितच घडेल असे विचार मांडून शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे विश्वस्त डेगवेकर यांनी शाळेची शिस्त व नियम यांचे पालन करून आदर्श व्यक्तीमत्व तयार करावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या . यावेळी नगर पंचायतीचे प्रतिधिनी म्हणून अधिकारी वर्ग उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच पालक वर्गातून उत्साहाचे वातावरण होते. प्रशालेच्या सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी जय्यत तयारी करून नविन बालकांचे उत्साहात स्वागत केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *