कणकवली (प्रतिनिधी)
विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांचे निधन
राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रल्हाद नारायण धुले (४९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले . मुळ अहिल्यानगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील शेकटे गावचे रहिवासी असलेल्या घुले यांनी काही महिन्यांपुर्वीच सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला होता . मात्र, काही दिवस काम केल्यानंतर ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर होते .शुक्रवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले .
