बांदा (प्रतिनिधी)
गवळीटेम्ब येथे खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य ; बांदा दाणोली मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला
बांदा गवळीटेम्ब येथे बांदा दाणोली मार्गांवर चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहे. पावसातच वाफोलि येथिल चार कि.मी. रस्ता व बांदा गवळीटेम्ब येथे खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बांदा दाणोली मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला. प्रवासी पर्यायी मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा मार्ग बंद होण्याच्या मार्गांवर आहे. संबधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
गोव्यात जाण्यासाठी आंबोली वर्षा पर्यटनासाठी जवळचा मार्ग असून मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला मोठ मोठे खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मोठी हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे.

