देवगड (प्रतिनिधी)
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी देवगडात उद्या तिरंगा यात्रा
सातपायरी गणेश मंदिर ते देवगड एसटी स्टँड असा असणार यात्रेचा मार्ग भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांची माहिती
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी देवगड मंडलाच्या वतीने शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. देवगड सातपायरी, उद्यान गणेश मंदिर येथून उद्या रविवारी सकाळी 10 वा ही यात्रा निघेल आणि देवगड एसटी स्टॅन्ड येथे ही तिरंगा यात्रा समाप्त होईल.भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत ही तिरंगा यात्रा निघेल, तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे ही विनंती.

