लिपिक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे – कोटकामते ग्रामस्थांची संस्थाध्यक्ष मुख्याध्यापक यांच्याकडे मागणी
श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामते येथे कनिष्ठ लिपिक पदासाठी चालू असलेल्या भरती प्रक्रियेत गावातील स्थानिक, पात्र व सुशिक्षित उमेदवारास प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी एक सविनय निवेदन विद्यालयाचे मुख्याध्यापक व अध्यक्ष यांना सादर केले आहे. सदर निवेदनावर एकूण ८५ ग्रामस्थांच्या सह्या असून, सरपंच ऋतुजा खाजणवाडकर, उपसरपंच गणेश घाडी, माजी उपसरपंच विजय कुडपकर, व माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
“गावातील उमेदवार हा आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता असलेला, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय आहेत. गावाच्या विकासात स्थानिक युवकांचा सहभाग वाढावा व रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी स्थानिक उमेदवारास संधी दिली पाहिजे,” असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
गावातील युवकांना प्रोत्साहन मिळावे व संस्थेच्या कार्यात स्थानिकांचा सहभाग वाढावा, ही ग्रामस्थांची भूमिका असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते.संस्था संचालकांच्या बेताल वक्त्याव्या नंतर ग्रामस्थ अधिक आक्रामक झाले असून शासनाकडे चौकशीची मागणी करणार आहेत.