माध्य.शाळा वाचवा, नवीन संच मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी ; २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी-पालकासह शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा

0 minutes, 3 seconds Read

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

माध्य.शाळा वाचवा, नवीन संच मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी ; २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी-पालकासह शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा

विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारा 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार झालेली नविन संचमान्यता रद्द करण्यासाठी विद्यार्थी,पालक,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांच्यावतीने २ मे रोजी दु.१२ वा रवळनाथ मंदिर ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयालयावर शिक्षक भारती सिंधुदुर्ग व समन्वय समितीच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आली आहे.

15 मार्चच्या शासन निर्णयानुसार झालेल्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्ह्यातील तब्बल 800 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, तर सुमारे 90 माध्यमिक शाळेत शून्य शिक्षक संच मान्यतेत दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे या शाळांना शिक्षकच मिळणार नाही. या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकायचे कसं ? असा एक प्रश्न पालक आणि शिक्षक संस्थाचकांसमोर उभा राहिला असून या अन्यायकारक संचमान्यतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे.

त्यामुळे अनेक शाळा बंद पडणार आहेत याची झळ विद्यार्थी,पालक,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनाही बसणार आहे. सदरची अन्यकारक नवीन संचमान्यता तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना, संस्थाचालक संघटना,मुख्याध्यापक संघटना यांच्यावतीने समन्वय समितीमार्फत सर्व संघटना या मोर्चात उतरणार आहेत.

तरी जिल्ह्यातील शाळा वाचवण्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी, शाळेत गुरुजनवर्ग राहण्यासाठी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक ,शिक्षक- शिक्षकेतर बधूभगीनींने तसेच विद्यार्थी- पालक आणि संस्थाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक भारती राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर व सचिव समिर परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.याची झळ विद्यार्थी, पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनाही बसणार आहे. सदरची अन्यकारक नवीन संचमान्यता तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना, संस्थाचालक संघटना,मुख्याध्यापक संघटना यांच्यावतीने समन्वय समितीमार्फत सर्व संघटना या मोर्चात उतरणार आहेत.

तरी जिल्ह्यातील शाळा वाचवण्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी, शाळेत गुरुजनवर्ग राहण्यासाठी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक ,शिक्षक- शिक्षकेतर बधूभगीनींने तसेच विद्यार्थी- पालक आणि संस्थाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक भारती राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर व सचिव समिर परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *