रेल्वे स्टेशन सुशोभिकरण कामात ठेकेदार अधिकारी मालामाल -परशुराम उपरकर

0 minutes, 1 second Read

कणकवली दि ७ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

 

रेल्वे स्टेशन सुशोभिकरण कामात ठेकेदार अधिकारी मालामाल -परशुराम उपरकर

 

कणकवली रेल्वे स्टेशनचे विमानतळाप्रमाणे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामात ठेकेदार आणि अधिकारी मालामाल झाले आहेत. तर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत, अशी टीका माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज केली. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, विमानतळाच्या धर्तीवर कणकवली रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करून कार्यकारी अभियंता, इतर अधिकारी, पालकमंत्री आपली पाठ थोपटून घेत आहेत. काहीतरी भव्यदिव्य केल्याचे जनतेला भासवत आहेत. प्रत्यक्षात हा सर्व दिखावा आहे. रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागत आहे. खरं तर प्रवासी रेल्वेत चढताना-उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्या प्लॅटफॉर्मवर सुविधांची उभारणी करण्याची गरज होती.

उपरकर म्हणाले, सुशोभिकरण करताना कणकवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरील जागा रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते, त्या धर्तीवर रेल्वे प्लॅटफॉर्मवर शेड उभारणीसाठीही रेल्वे खात्याकडून परवानगी मिळू शकते. तसे झाले असते तर त्याचा मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना झाला असता. मात्र कोट्यवधी रूपये खर्च करूनही त्याचा कोणताही फायदा जनतेला झालेला नाही. उलट अधिकारी आणि ठेकेदार यात मालामाल झाले आहेत. तसेच अप्रत्यक्षपणे याचा फायदा पालकमंत्र्यांनाही झाला आहे. श्री. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकास कामांसाठी निधी आणल्याचे पालकमंत्र्यांकडून सांगितले जाते. पण त्यांच्या अखत्यारीत येणारी सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. करूळ घाटातील संरक्षक भिंती कोसळत आहेत. भुईबावडा आणि फोंडाघाटातही निकृष्ट कामे झाली आहेत. मालवण रेस्ट हाऊस येथेही खड्डा पडला आहे. तर कणकवली रेस्ट हाऊस इमारत गळत आहे. विविध कामांसाठी खर्च झालेले कोट्यवधी रूपये वाया गेले आहेत. कार्यकारी अभियंत्यांमुळे विकास कामांचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोपही श्री. उपरकर यांनी केला.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *