फणसाच्या झाडावरून पडून ७२ वर्षीय इसमाचा मृत्यू ; वाघीवरे मांजरेकरवाडी येथील घटना
देवगड तालुक्यातील वाघीवरे मांजरेकरवाडी येथील रवींद्र भाऊ मांजरेकर (७२) यांचा फणसाच्या झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास घडली.
उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र मांजरेकर हे तेथीलच औदुंबर मांजरेकर यांच्या मालकीच्या फणसाच्या झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. यावेळी त्यांचा झाडावरून तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. दोन भाऊ आणि त्यांचा परिवार आहे. या घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलीस स्थानकात झाली नव्हती.