मडुरा येथे शाळकरी मुलीचे अपहरण ; युवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
बांदा (प्रतिनिधी)७ ऑगस्ट २०२४
मडूरा येथील एका अल्पवयीन मुलीचे तेथील युवकाकडून अपहरण करण्यात आली सदरची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली सदर अपहरण प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार महादेव उर्फ मंदार दत्ताराम परब ( रा. मडूरा रेडकरवाडी) याच्यावर बांदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मडूरा येथील एक शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या प्रशालेत जात होती दरम्यान महादेव उर्फ मंदार परब ह्या युवकाने तिला आपल्या दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केले असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे.सदर घटनेनंतर बांदा पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असून पोलीस दिवसभर त्या युवकाचा शोध घेत होते मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले नव्हते. या बाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत असून त्या युवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
