तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ही बेल्ट परीक्षा राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सोनिया ढेकणे व दुर्वा गावडे ह्या उपस्थित होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यपिका सौ. निलम डांगे तसेच सहाय्यक शिक्षिका सौ. जान्हवी हर्डीकर, सौ. सिद्धी जोशी, सहाय्यक शिक्षक श्री. अमोल चौगुले यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.