माजी आ. परशुराम उर्फ जीजी उपरकर यांची १४ एप्रिल रोजी सायं. ६ वा. भगवती हॉल, कणकवली येथे उत्कट भावनांची प्रकट मुलाखत होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शन निवेदिका स्मिता गव्हाणकर व मुक्त पत्रकार ऋषी देसाई हे घेणार आहेत. राजकीय आणि सामाजिक जीवनात भावनेने प्रेरित होवून आपले विचार पेरीत समाजकार्य करणारे माजी आम. परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अंतरंग उलगडणारी प्रकट मुलाखत आयोजित केली आहे. या कार्यक्रमास जीजी उपरकरप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जीजी उपरकर मित्र मंडळाने केले आहे.