बांदा येथिल श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव
– बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री परंपरेप्रमाणे स्थानिक भजनकर्मीच्या प्रतिवार्षिक भजनाने उत्सवाचा आरंभ होईल.शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी रात्रौ ठिक १०.०० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी यांचा”ऋतुमती हरण” हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ठिक ६.०० वा. श्री हनुमान जन्म कार्यक्रम व पारंपारिक श्री हनुमान फेरी होईल.सायंकाळी ४ ते ५ श्रीराम नाम जप, सायंकाळी ५.०० ते ६.०० श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन सेवा मंडळ, बांदा यांची भजन सेवा होईल. सायंकाळी ठिक ७.३० वा. पुणे येथील प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. मानसीताई बडवे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सिध्देश विनोद शिरोडकर आणि श्री हनुमान सेवक मंडळ, बांदा यांच्या वतीने करण्यात आले आहे