मालवण तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायतींवर महिलाराज

0 minutes, 3 seconds Read

 

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायतींवर महिलाराज.

मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात ३२ ग्रामपंचयातीवर महिला सरपंच थेट विराजमान होणार आहेत. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार नागेश शिंदे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थीनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्याहस्ते आरक्षण सोडत करण्यात आली. यावेळी अनेक गावातील सरपंच आणि इच्छूक उमेदवारांची गर्दी मामा वरेरकर नाट्यगृहात झाली होती.

अनुसूचित जाती प्रवर्ग – गोळवण, राठीवडे, बांदीवडे बुद्रुक अनुसूचित जाती महिला – तळगांव, त्रिंबक, अनुसूचित जमाती महिला – वराड, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – हेदूळ, गोठणे, कुंभारमाठ, नांदरुख, धामापूर, कोळंब, आंबडोस, बांदीवडे खुर्द कोईल, रामगड, नागरिकांचा मागास प्रवर्ग – वेरळ, देवबाग, चौके, वायंगवडे, पोर्वप, वायरी भूतनाय, पेंडूर खरारे, तारकर्ली काळेथर, काळसे, सर्वसाधारण प्रवर्ग महिला – आनंदव्हाळ कर्लाचा व्हाळ, खोटले, बुधवळे कुडोपी, पळसंब, बीळवस, वायंगणी, सुकळवाड, वरची गुरामवाडी, आंबेरी, हिवाळे, कुणकवळे, असगणी, मठबुद्रुक, श्रावण, साळेल, महान, आडवली मालडी, मसदे चुनवरे, तिरवडे, तोंडवळी, सर्वसाधारण प्रवर्ग निरोम, चाफेखोल, माळगांव, रेवंडी, किर्लोस, ओवळीये, हड़ी, शिरवंडे, घुमडे, मिर्याबांदा, सर्जेकोट, देऊळवाडा, चिंदर, मर्डे, कांदळगाव, नांदीस, देवली, मालोंड, वडाचापाट, कातवड, आचरा, असरोंडी.

मालवण तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या मर्डे, बिळवस आणि देऊळवाडा ग ामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. या तिन्ही ग -मपंचायतींसाठी यापुर्वी टाकण्यात आलेल्या आरक्षणानुसारच कार्यवाही होणार आहे. आज टाकण्यात आलेले आरक्षण हे पुढील २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या निवडणुकीसाठी बंधनकारक राहणार आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *