माईण येथे आगीत राहते घर भस्मसात ; लाखोंचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

माईण येथे आगीत राहते घर भस्मसात ; लाखोंचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांचे मोठे असलेले सागवानी लाकडी घर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संपूर्ण भस्मसात झाले आहे. सदर घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माईण येथे घडली.दरम्यान घटनास्थळी गावातील सर्व नागरिकांनी धाव घेतली तसेच कणकवली पोलीस व अग्निशमन बंब ही दाखला झाला होता मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

    दोन सिलेंडर एक सिलिंडर चा झाला स्फोट

दरम्यान त्या जळत असलेल्या घरात दोन सिलेंडर होते. एक सिलेंडर बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या सिलेंडर चा मोठा स्फोट झाला सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान घराचे झाले आहे.
गेल्यावर्षी सागवानी असलेल्या घराला लाखोंचा खर्च केला होता.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *