बांदा (मंगल कामत)
मडूरा डीगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा
मडूरा डीगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.मात्र महावितरणने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.
मडूरा हायस्कूल नजीक डीपी जवळ दरवर्षी स्पार्किंग होऊन बागायतीना आग लागण्याचे प्रकार घडत असतात. मात्र, आग लागू नये यासाठी महावितरणने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास स्पार्किंग होऊन गवताला आग लागली. बांद्याहून मडूराच्या दिशेने येणाऱ्या झोळंबे माजी सरपंच श्री. गवस यांनी आग लागल्याची माहिती स्थानिकांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविले. यात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, बाबा बुगडे, सागर धूरी, उत्तम वालावलकर यांचा समावेश होता.
