कणकवली तालुक्यातील हळवल, सातरल तसेच देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील हळवल, सातरल तसेच देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यात हळवल, सातरल व देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

यावेळी हळवल येथे उपतालुकाप्रमुख राजू राणे, गणेश राणे, अनंत राणे, प्रभाकर चव्हाण, रोहित राणे, आप्पा ठाकूर, स्मिता परब, सुधाकर ठाकूर, शंकर राणे तसेच सातरल येथे सरपंच सविता मेस्त्री, सुहास राणे, गोट्या राणे,संदीप राणे, अक्षय राणे,अभिनव राणे सुशील परब,घनशाम गांवकर,संतोष साटम,सुभाष राणे,शांताराम राणे व खुडी येथे देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, उपतालुका प्रमुख विष्णू सावंत, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, मंगेश फाटक, मनोज भावे,कांता गांवकर, गौरव सावंत, खुडी सरपंच दीपक कदम, बाबू मेस्त्री, निलेश कामतेकर, सुदाम घाडीगावकर, मंगेश आरेकर व आदी ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *