जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न

0 minutes, 1 second Read

देवगड (प्रतिनिधी)

 

 

 

जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न

अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार देणगीतून शाळा झाली डिजिटल

 

अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार रु.देणगीतून कु.लक्ष्मण व कु.अमोघ यांचे नावे 65 इंची स्मार्ट डिजिटल बोर्ड जि.प.शाळा पडेल नं.1 प्रदान करण्यात आला. हा स्मार्ट डिजिटल प्रदान सोहळा गुरुवारी शाळा पडेल नं.1येथे संपन्न झाला. या स्मार्ट डिजिटल क्लासरुमचं उदघाटन भुषण पोकळे सरपंच पडेल व देणगीदार प्रतिनिधी कु.मयंक तानवडे व संपदा तानवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी डाएट सिंधुदुर्गचे अधिव्याख्याता डाॕ.लवु आचरेकर ,गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात,माजी सरपंच विकास दिक्षीत,केंद्रप्रमुख अशोक जाधव, SMC अध्यक्ष.डाॕ.आरोही दिक्षीत, पडेल हायस्कूल मुख्याध्यापक हिराचंद तानवडे बहुसंख्या पालक,ग्रामस्थ शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. अमेरिकेला असणाऱ्या अतुल तानवडे कुटुंबियांनी शाळेची गरज लक्षात घेऊन 1लाख 30, हजार ऐवढी रक्कम देऊन नवीन तंञज्ञानाचा शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगला व प्रभावी वापर करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल या हेतुने हा स्मार्ट बोर्ड दिला आहे.सर्वांनी तानवडे कुटुंबियांना मनस्वी धन्यवाद दिलेत. हा बोर्ड जि.प शाळेला मिळावा यासाठी विशेष प्रयत्न संपदा तानवडे SMC सदस्य यांनी केलेत . या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतं व्यक्त केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख अशोक जाधव यांनी केले. तर सूञसंचलन मुख्या.प्रिया आपोतीकर यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *