वैभववाडी (प्रतिनिधी)
उबाठा गटाचे सोनाळी सरपंच भीमराव भोसले, सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
उबाठा गटाचे सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतोष शेलार, जयवंत पवार, हरिचंद्र गुरव, सचिन कदम, प्रशांत कदम, राजेंद्र जाधव, सचिन भोसले, सुधीर जाधव व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
