देवगड : प्रतिनिधी
तब्बल १३ वर्षांनी, श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.
गुरूवारी पारंपारिक मार्गावरून ढोलताशांच्या गजरात रयतेसह किल्ला येथे गणपतीभेटीला निघालेला देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्रीदिर्बादेवी रामेश्वर देवस्वारीचे स्वागत फटाक्यांचा आतषबाजीत व नामघोषात करण्यात आले. तब्बल १३ वर्षांनी श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. गणपतीभेटीला निघालेल्या ग्रामदैवतांच्या आगमनाने शहरवासिय भक्तजन आनंदीत झाला.
