वेंगुर्ले येथे वीज दुरुस्तीसाठी जात असताना दुचाकी व रुग्णवाहिका अपघात एक ठार एक गंभीर

0 minutes, 0 seconds Read

वेंगुर्ले येथे वीज दुरुस्तीसाठी जात असताना दुचाकी व रुग्णवाहिका अपघात एक ठार एक गंभीर

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४

 

वेंगुर्ले येथील वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारी मोटरसायकलने रात्री वीज वितरणची सेवा दुरुस्त करण्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान  त्यांच्या मोटरसायकल आणि एका रुग्णवाहिकेची धडक बसून वेंगुर्ले गाडी नाका येथे अपघात झाला .या अपघातात दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात नेले होते.

त्यातील उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ बाळा गावडे असे त्यांचे नाव आहे. तर त्यांच्यासोबत असलेला बाह्य स्त्रोत कर्मचारी शिरोडकर हा गंभीर जखमी झाला आहे .या प्रकरणाचा  वेगुर्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *