अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत देवगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविले प्रथम पारितोषिक
नवकोंकण शिक्षण संस्थेच्या डी. बी. जे महाविद्यालय, चिपळूणच्या अर्थशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते.
दीपप्रज्वलन करून सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम, एस बापट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रजिस्टर श्री. अनिल कलकुटकी, माजी उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एम. एस. चांदा, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. के. नामदास आणि श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगडच्या प्राध्यापिका सौ. प्रिया खवळे इ. उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, व्हराडकर महाविद्यालय दापोली, खरे ढेरे महाविद्यालय गुहागर,कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाटपन्हाळे, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा, लोकनेते गोपीनाथ मुंडे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मंडणगड, आठल्ये – सप्रे महाविद्यालय देवरूख, श्री. शाहू महाविद्यालय पुणे, डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण आणि श्री. स. ह. केळकर.महाविद्यालय ,देवगड या विविध महाविद्यालयातील १४ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये ३ विद्यार्थ्यांचा एक संघ या प्रमाणे हे १४ संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा एकूण ७ फेऱ्यांमध्ये पार पडली.
ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगी अर्थशास्त्रावर आधारित सामान्यज्ञान , स्मरणशक्ती, तार्किकता, बौद्धिक विकास, स्पर्धात्मक शक्ती, व्यक्तिमत्त्व विकास यासारखे गुण वाढीस लागावे या अनुषंगाने घेण्यात आली होती. या स्पर्धेत गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेत श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडचे कु. वृषाली कोयंडे, कु. किरण आंबेरकर आणि कु. हर्ष जाधव हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रल्हाद कांबळे, प्राध्यापिका सौ. प्रिया खवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विकास मंडळ देवगडचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुनुरे सर, उपप्राचार्य(प्रशासन) प्रा.श्रीकांत सिरसाटे आणि उपप्राचार्य डॉ.सुरवसे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.